भरगच्च भरलेले Hoover Theater! जय भवानी.. जय शिवाजी चा सर्वत्र नामघोष आणि मनामनात महाराष्ट्राचा जल्लोष असेच काहीसे दृश्य जेव्हा कॅलिफोर्निया मध्ये पाहायला मिळते तेव्हा सर्वांच्या मनातील भावना शब्दात व्यक्त करणे जरा कठीण आहे. असे हे दृश्य पाहायला मिळाले महाराष्ट्र मंडळ बे एरिया तर्फे आयोजित कला महोत्सवाच्या वेळी!
कला महोत्सवात एकूण सात कार्यक्रम आयोजित झाले. सप्तरंगी इंद्रधनुश्य जसे आकाशात रंग उधळून सर्वांना आनंद देतात तसेच काहीसे प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादाने व प्रेमाने पार पडले. कलामहोत्सवाच्या तयारीची सुरुवात जवळ जवळ सहा महिने आधीच सुरू झाली होती. तयारी करण्याचीही एक वेगळी मजा आणि अनुभव सगळ्या volunteers ने व्यक्त केली. कला महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी संध्याकाळी मराठी व हिंदी गाण्यांच्या सुंदर मैफिलीने झाला, त्यात भर घातली ती सुंदर अश्या नृत्याने. पूजा व राजू यांचा छान असा कार्यक्रम व जोडीला पिझ्झा मुळे सगळ्यांनी कार्यक्रम खूपच enjoy केला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून Entrepreneur आणि देऊळ या movie चे निर्माते अभिजित घोलप यांनी सुशोभित केले. त्यांचे मार्गदर्शन सर्वच उपस्थीत कलाकारांसाठी motivational होते.
दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली एक अतिशय रंगलेल्या शास्त्रीय संगीत मैफिलिने. नंतर तर इशिता कोठवडे आनी बाल चमूने सादर केलेल्या एका जोरदार कार्यक्रमास सर्वच प्रेक्षकांनी भरभरून स्तुती सुमनांची उधळण करत मनापासून दाद दिली. सुधीर फडके म्हणजेच बाबूजींच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांनी गीत रामायनातील व इतर गाणी ऐकून भारता बाहेरील आपल्या पुढच्या पिढीचे कौतुकच वाटले.
त्यानंतर एक अतिशय खास असा अजून एक छान माणिक मोती हा गीतांचा कार्यक्रम खूपच छान प्रकारे पार पडला. या कार्यक्रमास Seattle Maharashtra Mandal येथून performers आले होते. त्यांनी माणिक वर्मा यांचे कौसल्येचा राम व इतरही सुंदर गीते आणि त्याचबरबर त्यांचे जीवन देखील रंगवले.
आता आला होता तिसरा आणि कला महोत्सवाचा अंतिम दिवस, पण आधीचे सर्व कार्यक्रम पाहून – प्रेक्षक, आयोजक आणि performers चा उत्साह अगदी द्विगुणत झालेला होता. आज दिवस होता तो म्हणजे नृत्याचा (dances). त्यादिवशी पहिला कार्यक्रम हा कृष्णच्या भक्तीत तल्लीन अश्या छान अश्या दृश्यात सुरू झाला. त्यांच्यापाठोपाठ दुर्गा झाली गौरी ह्या कार्यक्रमात तर अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अश्या बऱ्याच डान्सर्स नी त्यांची सुरेख कला प्रदर्शित केली. प्रेक्षकही या सर्व प्रवासात खूप सुंदर दात देत एकेक कार्यक्रम मनापासून एन्जॉय करत होते. आता वेळ आली होती ती म्हणजे शेवटच्या कार्यक्रमाची जो होता जल्लोष महाराष्ट्राचा. ज्यामध्ये लोकगीतांचा एक अतिशय सुंदर प्रवास वर्णन करत अगदी दिंडीचेही रूप साकारत शेवटी जय महाराष्ट्र च्या नाद घोषात आणि प्रे्षकांच्या उत्साहात पार पडला!!